कोल्हापूर : भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकारी माधुरी शिंदे यांची पतीकडून हत्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 24 जून 2018

कोल्हापूर : भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकारी माधुरी शिंदे यांची पतीकडून हत्या.


पती-पत्नीत गेल्या काही वर्षापासून सुरू असलेला घटस्फोटाचा वाद आणि अनैतिक संबंधाच्या संशयातून उदगाव (ता.शिरोळ) येथे पतीने पत्नीचा कु-हाडीने घाव घालून मुलासमोर खून केला. माधुरी सुर्यकांत शिंदे (वय 39) असे महिलेचे नाव आहे. पत्नीचा खून केल्यानंतर सुर्यकांत शिंदे हा स्वत: जयसिंगपूर पोलिसात हजर झाला. घटना स्थळावर हजर असलेला संतोष श्रीकृष्ण माने-घालवाडे या तरूणालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी मुलगी रेवा सुर्यकांत  शिंदे (वय 17) हिने फिर्याद दिली आहे. माधुरी या भूमाता ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा होत्या. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. माधुरीच्या आईने व बहिणीने घटनास्थळी आक्रोश केला. पोलिसांनी पंचनामा करून गुन्ह्यात वापरलेली कु-हाड ताब्यात घेतली आहे. सकाळी  ११.३० ते दुपारी १२.३० वा. च्या सुमारास ही घटना घडली.वडिलांनी कु-हाडीने आईला मारल्याची आणि यावेळी संतोष माने घरात होता असा जबाब  मुलगा शिवराज (वय 8) याने दिल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकित दिली. आरोपी सुर्यकांत याने पत्नीला व मानेला विचित्र अवस्थेत पाहिल्याने त्या मानसिकतेतून खून केल्याची कबुली दिल्याची माहितीही पिंगळे यांनी यावेळी दिली. उदगांव येथील जुना वैरण अड्डा चौकात कृष्णामाईसेवा संस्थेलगत शिंदे यांचे घर आहे. माधुरी या मुलगी रेवती व मुलगा शिवराज (वय8) यांच्यासह दोन खोलीवजा घरात तर लगतच सुर्यकांत, आई, वडिल असे वेगळे राहत होते. पाच-सहा वर्षापासून दोघात कौंटुबिक वाद सुरू असून तो न्यायप्रविष्ठ आहे. या वादातून दीड-दोन वर्षापूर्वी सुर्यकांतने माधुरी यांच्या डोक्यात लोखंडी पहार घातली होती. तो गुन्हा पोलीसात नोंद आहे.शनिवारी सकाळी संतोष माने व माधुरी हे घरात होते. अनैतिक संबध आणि विचित्र अवस्थेत पाहिले.मी दारावर टकटक केली. माझ्यात व माने याच्यात वाद झाला. पती-पत्नीत घटस्फोटाचा वाद असला तरी आम्ही अजून पती-पत्नी आहोत. मानेला मी वारंवार सांगतिले होते,मात्र त्याने ऐकले नाही. या मानसिकतेतून मी पत्नीचा खून केला असा जबाब सुर्यकांतने दिल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक पिंगळे यांनी दिली.कु-हाडीचे वर्मी घाव बसल्याने माधुरी यांचा जागेवरच मृत्यू झाला. दोन खोल्यांच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत त्या कोसळल्या होत्या. त्या ठिकाणी च कु-हाड पडली होती. डाव्या मानेवर,कानाजवळ, पाठ व हातावर पाच ते सहा वार झाले आहेत. सुर्यकांत हा मुलासह पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांची कुमक घटनास्थळावर दाखल झाली.उपनिरीक्षक किरण दिडवाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शहाजी निकम व  शिरोळचे समीर गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक सुरेश नलवडे यांच्यासह जशरोळव जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होते.घटनास्थळी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पंचनामा झाल्यानंतर दुपारी ३.१५ वाजता  मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यातआला. मुलगी रेवाने फिर्यादित, वेगळे राहात असल्यापासून चारित्र्याचा संशय वडील घेत होते.त्यातून आईचा धारदार कु-हाडीने वार करून ठार मारल्याचे म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षकशहाजी निकम तपास करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें