परभणी शहरात सोनार समाज जनगणनेस सुरवात.
सोनपेठ/परभणी (राजेश खेडकर) दि. १४मे २०१८सेवा नरहरींची या उपक्रमांतर्गत परभणी शहर येथील सर्व शाखीय सोनार समाज जनगणनेस सोनार समाजातील ज्येष्ठ समाज सेवक तथा संत नरहरी महाराज संस्थानाचे कोषाध्यक्ष श्री. विठ्ठलराव शहाणे यांची प्रथमतः संपूर्ण कुटुंबाची माहीती नोंदवून जनगणनेस सुरुवात करण्यात आली. परभणी शहरातील दर्गा रोड, राम नगर, शांती नगर, सदगुरु नगर, बालाजी नगर, बापु नगर, असिफा नगर, जुना पेडगाव रोड परिसरातील सोनार समाज बांधवांची नांव यावेळी नोंदणी करण्यात आली.
या मोहीमेत कुटुंबप्रमुखांपासून ते नवजात अर्भकांपर्यंत सर्वांची संपूर्ण माहीती विनामूल्य नोंद करून घेतली जाणार आहे, तसेच कुटुंबातील विवाह योग्य मुला-मुलींची संपूर्ण माहिती छायाचित्रासह एका स्वतंत्र फॉर्म वर लिहून घेतली जात आहे. ज्यामुळे समाजातील विवाह जुळविण्यास व योग्य वधु वर शोधकामी मदत होणार आहे. सर्व माहीती संकलीत झाल्यावर कुटुंबप्रमुखास सदरील जनगणनेची स्मरणीका विनामूल्य भेट स्वरुपात देण्यात येणार आहे, तरी जनगणनेसाठी घरी आलेले प्रतिनिधींना परभणी शहरातील सोनार समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन सोनार समाज माजी अध्यक्ष संतोष ज्ञा. शहाणे, सराफ असो. जिल्हा संघटक अमोल कुलथे (पांगरकर), दैवज्ञ सोनार समाज अध्यक्ष बाळासाहेब रोडे, अतुल काटकर, बाळू डहाळे, विनोद शहाणे, विजय डहाळे, प्रमोद पेडगावकर, अशोक टाक, नाना मैड, बालाजी टाक, नरहरी शहाणे, विश्वाजीत काटकर, सतीश डहाळे, विशाल गहूले, अदींनी केले असुन; अधिक माहिती व संपर्कासाठी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधन्याचे आवाहन करण्यात आले आहे.
9890091411, 7276999000,
8275676713, 9923135737,
9404074790, 8624072222,
9890977968

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें