एम आई एम ची पूर्णा न प बोगस कामांची चौकशी ची मागणी.
जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी-जिल्हाधिकारी पूर्णेतील निवेदनाची दखल घेतली काय?.
परभणी प्रतीनीधी
समशेर खान.
पुर्णा नगरपरिषद अंतर्गत विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची निकृष्ट दर्जाचे व कागदोपत्री कामे सुरू असुन सदरील निकृष्ट कामे त्वरित थांबवून दोषींवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हाधिकारी साहेबांना करण्यात आली प्रभारी मुख्याधिकारी, अभियंता,लेखापाल, टक्केवारी शिवाय काहीच कामाचे नसल्याने एका आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध प्रकारच्या तीन तक्रारी
पूर्णा नगरपालिका ही राम भरोसे चालत असुन प्रभारी मुख्याधिकारी हेमंत कुरुडकर, अभियंता वाघमारे, लेखापाल पवार हे त्रिकुट नगरअध्यक्षा व नगरसेवक यांची मर्जी सांभाळण्यात मग्न असुन आम नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी वेळ मिळत नाही यामुळे पूर्णा नगर परिषद ही रामभरोसे असुन गेल्या एका आठवड्यात शहरातील पूर्णेतील नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात भेटुन निवेदन दिले असुन काल एम आई एम पक्षाचे शहर अध्यक्ष मोहम्मद शफीक ,उपाध्यक्ष हबीब बागवान यांनी जिल्हाधिकारी यांना शहरात दलित वस्ती, रास्ता अनुदान, ठोक अनुदान ,आमदार निधी, खासदार निधी मधुन कागदोपत्री व निकृष्ठ दर्जाची कामे अंदाजपत्रकात नमुद वस्तूंची पूर्तता न करता मनमानी पद्धतीने गुत्तेदारांसोबत संगनमत करून स्थानिक नगरसेवक ,जनतेने निवडुन दिलेल्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, अभियंता, व लेखापाल यांची साखळी शासनाच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारत असुन आपण स्वतः पूर्णेला भेट देऊन व गुणनियंत्रका मार्फत तपासणी करुन दोषींवर कार्यवाही करावी व गुत्तेदारांनी बिले त्वरित थांबवावी व शासनाचे नुकसान टाळावे अशी मागणी जिल्हाधिकारी साहेबांकडे करून त्याची प्रतिलिपी विभागीय आयुक्त औरंगाबाद व नगरविकास खाते मुंबई यांना पाठवण्यात आल्या आहेत सध्या शहरातील अडचणीबाबत मा जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांना आम नागरिकांसह राजकीय पक्षांनी सुध्दा पूर्णा नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराचे भस्मासुर निदर्शनास आणून दिले आहे संबंधित भ्रष्टाचार बाबत कोणती कार्यवाही करण्यात येते याकडे पूर्णेकरांचे लक्ष लागले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें