सेलुत पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तहसिलदारांना निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 28 मई 2018

सेलुत पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तहसिलदारांना निवेदन.

सेलुत पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तहसिलदारांना निवेदन.

समशेर खान.
सेलु(प्रतिनिधि) :केंद्र सरकारच्या वतिने पेट्रोल व डिझेल ची दरवाढ करण्यात आली असल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असुन या दरवाढीचा निषेध नोंदवत तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेसच्या वतिने तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. सोमवार 28 मे रोजी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची भाववाढ केल्याने जनतेचे हाल होत आहेत.केंद्रात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. परंतु पेट्रोल व डिझेल दरवाढ ही अन्यायकारक आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही पेट्रोल व डिझेल हे शासनाने करमुक्त करुन वाढलेली दरवाढ तात्काळ थांबवावी व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेसच्यावतिने अंदोलन करण्यात येणार असल्याचे ही निवेदनात नमुद करण्यात आले असुन यासाठी जि. प. सदस्य राजेंद्र लहाने,अँड. बालासाहेब रोडगे, ब्रम्हानंद मोगल, विशाल देशमुख,भारत इंद्रोके,रामेश्वर गाडेकर, शाहेद लाला, गौस लाला, सचिन शिंदे, गौतम साळवे, पप्पु शिंदे, परवेज सौदागर, अँड. प्रभाकर गिराम, कुणाल मोगल, दिनेश गाडेकर आदीसह कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें