भारत बंद=आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांचा लाठीचार्ज, सहा जणांचा मृत्यू,अनेक घायळ. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 2 अप्रैल 2018

भारत बंद=आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांचा लाठीचार्ज, सहा जणांचा मृत्यू,अनेक घायळ.

भारत बंद=आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांचा लाठीचार्ज, सहा जणांचा मृत्यू,अनेक घायळ.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याबाबत (अॅट्रॉसिटी अॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी आज पुकारलेल्या 'भारत बंद'ला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांसह इतर राज्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले. हरयाणामधील यमुनानगर येथे आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. याशिवाय देशातील मध्यप्रदेश, मेरठ, पंजाब, हिसार, फिरोजपूर अशा ठिकाणी दलितांनी काढलेल्या आंदोलनाला हिंसक वळण आले असून ठिकठिकाणी रास्तारोको, रेल्वेरोको करण्यात आला, तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. ग्वालियार आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरात बंद दरम्यान आतापर्यंत देशभरात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.
फिरोजपूर मध्ये आंदोलकांनी रेल्वे स्थानकात घूसून ऑफिसची तोडफोड केली आहे. या तोडफोडी दरम्यान रेल्वेचेकर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच, या आंदोलनामुळे जम्मू-तवी एक्स्प्रेस स्थानकावर थांबविण्यात आल्याने प्रवासी स्त झाले आहेत. दरम्यान, या प्रवाशांच्या मदतीसाठी येथील सामाजिक संघटना धावल्या असून त्यांनी प्रवाशांना पाणी आणि  जेवणाची सोय केली आहे. 
दुसरीकडे, पंजाबमध्ये बंदच्या पार्श्वभूमीवर सरकारी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर इंटरनेट सेवाही सोमवारी (2 एप्रिल) रात्रीपर्यंत बंद ठेवण्यात येणारआहे. मीरत मध्ये हिंसाचार प्रकरणी  200 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत असून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें