अंतर्गत वादातुन पंढरपूरजवळ तरूणाची हत्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 4 अप्रैल 2018

अंतर्गत वादातुन पंढरपूरजवळ तरूणाची हत्या.

अंतर्गत वादातुन पंढरपूरजवळ तरूणाची हत्या.

प्रतिनिधी.सोलापुर
पंढरपूर : पंढरपूरपासून जवळच असलेल्या रांझणी गावातील तरूणाचा अंतर्गत वादातून डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
गोट्या ऊर्फ सिताराम नंदु सुरवसे (वय २२) यांचा खुन झालेल्या तरूणाचे नाव आहे.

पंढरपूर तालुक्यातील रांझणी- ओझेवाडी रस्त्यावर असलेल्या ढाब्याजवळ ही घटना घडली आहे. अंर्तगत वादातुन हा खून केल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले आहे. 
दरम्यान, पोलीस निरीक्षक श्री.खराडे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. खुनाच्या घटनेनंतर तालुक्यात मात्र खळबळ उडाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें