सांगलीत पोहणाऱ्यांच्या घोळक्यात घुसली १८ फुटी मगर!, ७० मुले बचावली - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 7 अप्रैल 2018

सांगलीत पोहणाऱ्यांच्या घोळक्यात घुसली १८ फुटी मगर!, ७० मुले बचावली

सांगलीत पोहणाऱ्यांच्या घोळक्यात घुसली १८ फुटी मगर!, ७० मुले बचावली.
url

सांगली येथील कृष्णा नदीत पोहणा-यांच्या घोळक्यात अचानक १८ फुटी मगर घुसली अन् सा-यांचा एकच थरकाप उडाला. ‘पळा...बाहेर पडा...अरे मगर आली’, असे म्हणत प्रत्येकाची आरडाओरड आणि धावाधाव सुरु झाली. सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण व मोहन पेंडसे यांनी प्रसंगाधाव राखून नावेतून पाठलाग करुन या मगरीला हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला. सकाळी साडेआठ ते नऊ या वेळेत ही थरारक घटना घडली. मगरीला वेळीच हुसकावल्याने ७० मुले बचावली. कृष्णा नदीच्या काठावर दररोज मगरीचे दर्शन होते. तरीही दररोज पोहायला जाणार्यांची संख्या कमी झाली नाही. सध्या ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने पोहायला प्रचंड गर्दी असते. विशेष शाळकरी मुले पोहण्यास शिकायला येत असल्याने गर्दी वाढली आहे. शनिवारी सकाळीसाडे आठ वाजता वसंतदादा समाधीस्थळ ते सांगलीवाडी या मार्गावरील नदीकाठी दुतर्फा पोहायला गर्दी होती. वसंतदादांच्या समाधीस्थळापासून १८ फुटी मगरीने अचानक पाण्यात प्रवेश केला. पाण्यातून लपत ती पोहणाऱ्या लहान-मोठ्यांच्या घोळक्यात घुसली. मगर घुसल्याचे समजताच सार्यांचा थरकाप उडाला. ‘अरे पळा मगर आली आहे’, असे काही जणांनी सांगताच अनेकांची घाबरगुंडी उडाली. प्रत्येकजण पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धावाधाव करु लागला. विशेषत: शाळकरी मुले गोंधळून गेली. पाण्यातून बाहेर पडताना अनेकजण पायऱ्यांवर पाय घसरुन पडले. पोहणाऱ्यांचा एवढा दंगा सुरु होऊनही मगर जाण्याच्या तयारीत नव्हती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण व मोहन पेंडसे यांनी नाव घेतली. नावेतून त्यांनी मगरीचा पाठलाग केला. बायपास पुलाच्यादिशेकडेमगर पळाली. तेथून ती गायब झाली. तिला वेळीच हुसकावल्याने पोहायला आलेली लहान-मोठी सत्तर मुले बचावली. अर्धातास हा थरार सुरु होता. त्यानंतर पोहणाऱ्यांना मगरीपासून सावध रहावे, असे आवाहन संजय चव्हाण यांनी केले. हरिपूर, विष्णूघाट, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट येथेही पोहणाºयांना मगरीचे दर्शन झाले. या घटनेनंतर अनेकांनी काठावर बसूनही अंघोळ केली. शाळकरी मुलेही काठावरच थांबून राहिली. प्रत्येकाने आरडा ओरड करुन मगर आल्याचे सांगितल्याने सर्वजण सावध झाले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें