मुसळधार पावसामुळे ताजमहालाचा खांब कोसळला.
आग्रा : उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान पावसाचा फटका जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालालाही बसला असून प्रवेश द्वारावर असलेला खांब कोसळला आहे. खांब कोसळला तेव्हा तिथे कोणीही उपस्थित नसल्याने सुदैवानी कोणालाही इजा झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, ताजमहालाच्या दक्षिण दिशेला असणा-या प्रवेशद्वारावरील खांब मुसळधार पावसामुळे बुधवारी मध्यरात्री कोसळला. सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.पावसाशी संबंधित अजून एका घटनेत आग्र्यापासून ५० किमी अंतरावर मथुरा जिल्ह्यात छत कोसळल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला. छत कोसळलं तेव्हा मुलांचे आई-वडील घरात नव्हते. दोघेही रोजंदारी मजूर असून कामानिमित्त बाहेर होते. मुसळधार पावसाचा फटका शेतीलाही बसला असून मथुरा जिल्ह्यात नांदगाव, वृंदावन आणि कोसी कालन परिसरात पिकं अक्षरक्ष: उद्ध्वस्त झाली आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें