आरोग्य उपकेंद्राचे लेखी आश्वासनानंतर उघडले कुलूप.
वैद्यकीय अधिकारी लटपटे यांनी यापुढे जर कर्मचारी गैरहजर राहिले तर कार्यवाही करण्याचे दिले आश्वासन.
सलिम खान.प्रतिनिधी-
भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी गैरहजर राहत असल्याने तरुणांनी 19 एप्रिल रोजी कुलूप ठोकले होते.त्याची दखल केदारखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. एस .जी.लटपटे यांनी गावात येऊन तरुणांशी सविस्तर चर्चा करून लेखी आश्वासन दिले.त्यांनी निवेदनात नमूद केले की आरोग्य सेविका श्रीमती गायकवाड तसेच आरोग्य सहाय्याक श्री.दांडगे हे दररोज उपकेंद्रात येऊन रजिस्टर वर नोंद करून कार्यालयात बैठक बोर्डवर दौरा टाकूनच बाहेरील गावांना भेटी देण्यास जातील.ज्या दिवशी बाहेरगावी जायचे नसल्यास ते सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत कार्यालयात थांबतील. एखादी डिलिव्हरी रूम किंवा अडीअडचणीच्या वेळी रात्री मुख्यालयात थांबून गावकऱ्यांस सेवा देतील.तसे न झाल्यास कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल ह्याची नोंद सर्व्हिस बुक मध्ये घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन तरुणांना दिल्यामुळे आरोग्य उपकेंद्राचे कुलुप उघडण्यात आले.
यावेळी ग्रा.सदस्य बालाजी लोखंडे,उपसरपंच समाधान लोखंडे,अनिल भुतेकर ,नारायण लोखंडे,संदिप भोकरे, अर्जुन खांडवे,शिवराम जऱ्हाड,समाधान लोखंडे,बळीराम लोखंडे,प्रदिप लोखंडे,काकासाहेब लोखंडे,डी. एस.लोखंडे आदींची उपस्थिती होती

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें