प्रधानमंत्री उज्ज्वला योजना केंद्रची कल्याणकारी योजने मोदीजीच्या नावाचा जयजयकार होत आहे. इद्रिस मुल्तानी.
शेख कलीम
सिल्लोड/प्रतिनिधी
मादणी येथील ग्रामपंचायतच्यावतीने गावातील गरजू लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 75 गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत सभागृहात आयोजित गॅस कनेक्शन वितरण समारंभाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिध्देश्वर कारखान्याचे चेअरमन इद्रिस मुल्तानी तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवन्याचे उपसरपंच अरूण पाटील काळे , जि.प.सदस्य गजानन राऊत , भाजपा युवा मोर्चाचे सुनिल काळे , तालुका उपप्रमुख सुभाष करवंदे , सरपंच प्रभाकर काळे पोलीस पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
गॅस वितरण प्रसंगी उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना इद्रीस मुलतानी यांनी, शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ जास्तीतजास्त गावकऱ्यांना व्हावा आता पर्यत 3000 गॅस वाटप तसेच उर्वरित 2 दिवसांत 4000 होईल.
स्वच्छ इंधन बेहतर जीवन या उक्तीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशातील प्रत्येक गरीब कुटूंबाला नि:शुल्क गॅस कनेक्शन देण्यासाठी प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ योजना सुरू करण्यात आली .सिल्लोड सोयगाव तालुक्याला कल्याणकारी योजनेचा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून पन्नास हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ घेतला.
स्वयंपाकाच्या धुराचा महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन धुरापासून मुक्ती देण्यासाठी प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ योजना देशभर राबविण्यातयेत आहे .असे ते बोलताना म्हणाले. यावेळी सरपंच संजय अपार उप सरपंच ड़ाॅ विजय काळे , ग्रामसेवक राजेश वाघ ,सोनिया गॅस मालक मिलींद घोरपडे , वितरक एजंसीचे व्यवस्थापक राहुल घोरपडे, सलीम कुरैशी, जुबेर शेख, साहेबराव घोरपडे , वसीम शेख , रवि तातड़े , अक्षय अपार , विष्णू अपारसह गावकऱ्यांची उपस्थिती होती .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें