नितीन क्रीडा मंडळाच्या वतीने उन्हाळी लेदरबाँल क्रिकेट प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन.
सेलू : (समशेर खान)नितीन कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ वतीने दि. 26 एफ्रील रोजी पारीख काँलनी येथे उन्हाळी लेदरबाँल क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन वक्षरोपन करून करण्यात आली.या प्रंसगी मंडळाचे अध्यक्ष माजी आ.हरिभाऊ लहाने, प्रसिद्ध उद्योजक नंदकिशोर बाहेती , उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, माजी नगराध्यक्ष पवनराजे आडळकर, व्हिजन इग्लिंश स्कुल अध्यक्ष संतोष कुलकर्णी, परसराम गेना, काबरा मंडळाचे सचिव संदीप लहाने, पारस काला, गणेश माळवे आदी उपस्थित होते.
या प्रंसगी नंदकिशोर बाहेती म्हणाले या ठिकाणी वक्षरोपन वाढ जशी होईल त्याप्रमाणे नितीन क्रीडा मंडळाची प्रगती होईल अशी शुभेच्छा दिल्या व आज युवक खेळाडू मैदानावर न राहता मोबाईल व टि.व्ही वर गुंतले आहे तर खेळाडू नी मैदानात येऊन आपली प्रगती करावी.
प्रशिक्षण शिबिर 26 एफ्रील ते 30 मे पर्यंत रोजी सांय 5 ते 6:30 वा . घेण्यात येणार आहे. शिबिरास 50 खेळाडू सहभागी झाले आहेत. प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय क्रिकेट पटू संदीप लहाने, प्रा. राजेश राठोड यांचे लाभणार आहे.
या प्रशिक्षण शिबिरात क्रिकेट सोबत व्हाँलीबाँल, कबड्डी, टेनिस व्हाँलीबाँल , खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यशस्वी ते साठी अमर सुरवसे, सचिन भेंडे, दिपक निवळकर, गजानन शैलार, राहुल भांडे परीश्रम घेत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें