मानवत येथील रत्नापुर जवळ अपघात ; सतरा जण जख्मी .
मानवत / मुस्तखीम बेलदार.दि.२८: कानसुर ता.पाथरी येथील शिंदे परिवार जांब ता.परभणी येथुन लग्न आटोपून गावाकडे पिकअप या वाहनाने दि.२७ एप्रिल राञी ८ वाजताच्या सुमारास जात असताना मानवत तालुक्यातील रत्नापुर जवळ भरधाव वेगाने मागुन येणाऱ्या ईनोव्हा गाडिने ओव्हरटेक करण्याच्या नादात पिकअप कडे वाहन दाबविले यातच पिकअप वाहन पलटी झाले. यात १७ जन जख्मी झाले असुन एक व्यक्तीस गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर ईनोव्हा गाडिवाला घटनास्थळी पासुन फरार झाला यानंतर वाटसरु लोकांनी ॲमब्युल्स बोलावुन जख्मीना तात्काळ हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.यातील एक व्यक्ती गंभीर जख्मी आहे अशी माहिती दगडू हॉस्पिटलचे डॉ.निनांद दगडु यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे. जखमी व्यक्तीची संख्या जास्त असल्याने आणि घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईकानी एकच गर्दी केल्याने जखमींची नावे माञ मिळु शकली नाहीत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें