सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीस साह्याद्रीची साथ
*महाड येथुन राजेंद्र कुट्रे यांनी केले ग्रंथदान
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२९ मार्च २०१८येथील वाचन संस्कृती जोपासन्यासाठी कार्य करत असलेल्या ग्रंथ वाचन चळवळीच्या उपक्रमाचे देश विदेशातुन स्वागत होत असल्याचे दिसुन येत आहे. वाचन संस्कृती जोपासन्यासाठी अनेक हात पुढे येत असुन, शहरातील अनेक वाचन प्रेमींच्या सहभागातून तालुक्यातील अनेक शाळा ग्रंथसंपन्न झाल्यानंतर, जिल्हा व जिल्ह्या बाहेरील अनेक शाळांना चळवळीच्या माध्यमातुन पुस्तके पोहोचली आहेत. यासाठी देश व विदेशातुनही मोठी मदत लाभत आहे.
सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीस अशीच मदत महाड जि.रायगड येथुन राजेंद्र मारुती कुट्रे यांच्यावतीने लाभली. कुट्रे यांनी त्यांच्या ५०व्या वाढदिवसा निमित्त महाड शहरातील महाड नगर परिषद शाळा क्रमांक ०१ या शाळेला १५०हुन अधिक पुस्तके भेट दिली. "चळवळीच्या फेसबुकवर टाकलेल्या पोस्ट वाचुन मलाही या उपकृमात सहभागी व्हावे" असे कुट्रे यांनी सांगितले. ग्रंथदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जाधव हे होते तर मंचावर संभाजी ब्रिगेडचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष वैभव द.शेडगे, छावा संघटनेचे अध्यक्ष मुद्दसरभाई पटेल, दिनेश पिसाट, महेंद्र घारे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.निशा कदम, उपाध्यक्षा सौ.वैशंपायन सहशिक्षक बहिरम आदींसह शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी शाळेच्यावतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक जाधव यांनी प्रास्ताविक भाषणात ग्रंथदानाचे महत्व विषद करुन अशाप्रकारचे कार्यक्रम वारंवार व्हावेत असे सांगितले. सौ.चिखले यांनीही विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवुन दिले. राजेंद्र कुट्रे यांनी शाळेचे ग्रंथदान स्विकारल्याबद्दल शाळेचे व सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीने ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल चळवळीचे आभार व्यक्त केले.
महामानव भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी केलेला सत्याग्रह व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनित असलेल्या रायगडाच्या परिसरातुन चळवळीस मदत प्राप्त होने म्हणजे खरे तर 'ग्रंथ चळवळीच्या ग्रंथदान उपक्रमाल साह्याद्रिची भक्कम लाथ लाभवी असेच म्हणावे लागेल' असे गौरवोद्गार सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर यांनी काढले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षीका सौ.माळवदे यांनी केले तर आभार श्रीमती बागड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहशिक्षक बहिरम, सौ.हाटे आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें