कोठाळा येथील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 9 मार्च 2018

कोठाळा येथील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

कोठाळा येथील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सोनपेठ (राजेश खेडकर)
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचं सत्र थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. तालुक्यातील मौ. कोठाळा येथील तरुण शेतकरी मुंजाभाऊ लिंबाजी बोरटकर (२३वर्ष) यांनी आज कापसावर बोंड आळीच्या प्रभावाने झालेल्या नुकसानीस व बँकेच्या कर्जास कंटाळुन शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावुन सकाळी ०५.०० ते ०८.०० वाजेच्या सुमारास आत्महत्त्या केली.  या आत्महत्येमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंजाभाऊ बोरटकर व त्यांच्या आई वडीलांच्या नावावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ८५हजार रुपयाचे कर्ज आहे.
मयताचे वडील लिंबाजी बापुराव बोरटकर यांच्या फिर्यादिवरुन सोनपेठ पोलीसात ०७/२०१८ कलम १७४ सीआरपीसी नुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात येऊन सपोनि जाधव हे अधिक तपास करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें