डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विशाल मिसाळ, सचिव पदी नगरसेवक दीपक बोर्डे तर कार्याध्यक्ष पदी प्रदीप जोगदंडे यांची निवड - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 4 मार्च 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विशाल मिसाळ, सचिव पदी नगरसेवक दीपक बोर्डे तर कार्याध्यक्ष पदी प्रदीप जोगदंडे यांची निवड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती  उत्सव समितीच्या  अध्यक्षपदी विशाल मिसाळ, सचिव पदी नगरसेवक दीपक बोर्डे तर कार्याध्यक्ष पदी प्रदीप जोगदंडे यांची निवड

शे.सलिम.
भोकरदन  (प्रतिनिधी )शहरातील  अशोका बुद्ध विहारात दि 25 फेब्रुवारी रोजी बैठक होऊन डाॅ . बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती साजरी करण्यासाठी सम्राट अशोक नवयुवक मित्रमंडळाची बैठक जेष्ठ समाजसेवक शामराव दांडगे यांच्या अध्यक्षतेखाली होवून जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी विशाल मिसाळ, सचिव पदी नगरसेवक दीपक बोर्डे तर  कार्याध्यक्ष पदी युवा नेते प्रदीप जोगदंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात  आली.
दरम्यान,  आगामी जयंती साजरी करण्यासाठी केवळ समाज बांधवा कडूनच वर्गणी घेण्यात येणार असून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे ठरले.
त्यानंतर उर्वरीत कार्यकारिणी ही जाहीर करण्यात  आली. त्यात उपाध्यक्ष म्हणून नगरसेवक कदीर बापू, नगरसेवक निरमलाताई भिसे, नगरसेवक रणवीरसिंह देशमुख, नगरसेवक राहूल ठाकूर  .तर कोषाध्यक्ष पदी सिद्धार्थ जाधव, सह कोषाध्यक्ष अमित मेश्राम, रमण पगारे, संघटक म्हणून किरण पगारे, बाळासाहेब पगारे, सह संघटक म्हणून विजय साळवे, अमोल पानपाटील , रवी आरके , सागर पगारे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांसह कमिटयांची घोषणा करण्यात आल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें