शशी थरूर ट्रोल, महावीर जयंतीनिमित्त गौतम बुद्धांचा फोटो केला ट्विट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 29 मार्च 2018

शशी थरूर ट्रोल, महावीर जयंतीनिमित्त गौतम बुद्धांचा फोटो केला ट्विट.

शशी थरूर ट्रोल, महावीर जयंतीनिमित्त गौतम बुद्धांचा फोटो केला ट्विट.

एरव्ही आपलं अस्खलित इंग्रजी आणि भन्नाट ट्विटमुळे काँग्रेसचे नेते शशी थरूर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. इंग्रजीवरील त्याचं प्रभुत्त्व पाहून त्यांचे फॉलोअर्स चक्रावून जातात. अनेकदा नेटकऱ्यांमध्ये कौतुकाचा विषय ठरलेले शशी थरूर मात्र एका चुकीच्या फोटोमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. आज महावीर जयंती आहे. त्यामुळे महावीर जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी थरूर यांनी ट्विट केलं पण यात महावीर यांच्या फोटो ऐवजी गौतम बुद्धांचा फोटो त्यांनी ट्विट केला.शशी थरूर यांच्याकडून अनावधानानं ही चूक झाली असली तरी सोशल मीडियावर मात्र त्यांना ट्रोल करण्याची एकही संधी नेटकऱ्यांनी सोडली नाही. शशी थरूर यांनी देखील आपली चूक तात्काळ मान्य केली. आपण एका वेबसाईटवरून हा फोटो घेतला होता. पण माझी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद असं म्हणत त्यांची माफी मागितली पण आता अनेकजण महावीर जयंती निमित्तानं ट्विट करत आहेत असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला आहे. शशी थरूर यांच्याकडून अशी चूक अपेक्षित नसल्यानं सोशल मीडियावर त्यांची खूप खिल्ली उडवली. अनेकांनी ट्विट करत त्यांच्यावर टिकाही केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें