बीडीएस परीक्षेत सेलु येथील मिथिलेश देशमुख देशात ७२ वा
सेलू. दि.२५/३/२०१८
येथील श्री.केशवराज बाबासाहेब विद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी मिथिलेश रेणुकादास देशमुख याने बीडीएस या देशव्यापी केंद्रीय स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून देशातून गुणवत्ता यादीत ७२ वे स्थान मिळविले आहे. मिथिलेश ने मिळवलेल्या यशाने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या निमित्ताने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक दुर्गादास कुलकर्णी व काशीनाथ ढोले यांनी शाल व श्रीफळ देऊन मिथिलेशचा यथोचित सन्मान केला.
या आधीही मिथिलेशने इयत्ता सातवी बीडीएस परीक्षेत देशातून ७७ वा येऊन विशेष यश संपादन केले होते हे विशेष.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें