सिल्लोड येथील सह निबंधकांची मनमानी.. चिरी मिरी घेतल्या शिवाय होत नाही रजिस्टरी - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 13 मार्च 2018

सिल्लोड येथील सह निबंधकांची मनमानी.. चिरी मिरी घेतल्या शिवाय होत नाही रजिस्टरी

सिल्लोड येथील सह निबंधकांची मनमानी.. चिरी मिरी घेतल्या शिवाय होत नाही रजिस्टरी....

शेतकरी, नागरिकांची आर्थिक कोंडी


अजय बाेराडे
(विशेष बातमी)
सिल्लोड: येथील सहायक  दुय्यम  निबंधक कार्यालयात एन-ए 44, एनए 45, 47 ब, सहान जागा घर खरेदी, प्लांट खरेदी, अकृषिक वापराच्या खरेदी विक्री व्यवहाराच्या रजिस्टऱ्या, दस्त नोंदणीचे काम गेल्या चार महिन्या पासून  होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. चिरी मिरी घेतल्या शिवाय रजिस्टरी होत नाही. सर्व सामान्य नागरिकांची अडवणूक केली जात आहे. यामुळे सिल्लोड शहरासाहित तालुक्यातील सर्व सर्व खरेदी विक्री चे व्यवहार ठप्प झाल्याने.शेतकरी, नागरिक आर्थिक कोंडीत सापडले आहे.

 खरेदी विक्री चे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांच्या मुला-मुलींचे लग्न रखडले आहे. याशिवाय आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे.अनेक नागरिकांनी शेतकऱ्यानी मुला-मुलींच्या लग्नासाठी  सावकाराकडुन व्याजाने पैसे घेतले आहे. अनेकांचे  बँकेचे कर्ज फेडायचे आहे.काहींना मुला मुलींचे लग्न करायचे आहे यामुळे नागरिक व्यतागले आहे.

 काय म्हणतो कायदा...
नोंदणी अधिनियम कायद्याने सह दुय्यम निबंधकास दस्तांची वैधता तपासण्याचा अधिकार नसुन नोंदणी अधिकाऱ्या समोर सादर झालेल्या दस्त व त्यासोबतचे कागदपत्रे खरे अथवा खोटे ठरवण्याचा अधिकार नाही. मालमत्ता अधिनियम  1886 कलम 135 व 36 अन्वये मालमत्तेची परस्परांनीच खात्री करणे आवश्यक आहे.आणि त्या आधारे दस्त नोंदणी करणे हे काम सह निबंधकाचे आहे.पण तसे न करता नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सिल्लोड ला होत आहे.
------------------
एन-ए 44 साठी तहसीलदारांचे पत्र आणा फर्मान...
   "प्लाॅट सहानजागा इ.दस्ताची नोंदणीसाठी तहसीलदाराचे पत्र आणा, एन-ए 44 असलेल्या लेआउट नकाशावर नगर रचना विभागाचा आज तारखेतला सिक्का आणा " असे बेजबाबदार पणाचे फर्मान सह दुय्यम निबंधक नागरिकांना देत आहे मात्र दुसरीकडे दलाल मार्फत चिरी मिरी घेऊन दस्त नोंदणी केली जाते.असा आरोप नागरिक करीत आहे. एन-ए 44 साठी ही नागरिकांची अडवणूक केली जात आहे.
------------------ -------------
चुकीचे व्यवहार होत आहे...
सिल्लोड येथील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात अकृषिक वापरासाठी खरेदी विक्रीचे काही चुकीचे
व्यवहार नोंदणी होत असल्याची तक्रार आली आहे. यामुळे  केवळ  एन ए 44  चिंच नोंदणी करावी. त्या शिवाय दस्त नोंदणी करू नये असे पत्र आम्ही दिले आहे.हे खरे आहे.
- सौरभ कटियार तहसीलदार सिल्लोड.
-------------------
खरेदी खत न करण्याचे आदेश...
चिरी मिरी घेऊन काम केले जातात... अडवणूक केली जाते हे आरोप चुकीचे आहे. सिल्लोड तहसीलदारांनी अकृषिक परवानगी एन ए 44 शिवाय दस्त नोंदणी करू नये असे पत्र दिल्याने इतर सर्व दस्त नोंदणी बंद केले आहे. अडवणूक करीत नाही.
- सह दुय्यम निबंधक चकलावार सिल्लोड.

__________________________________
धरणे आंदोलन करणार....
सिल्लोड येथील सह दुय्यम कार्यालयातील सह दुय्यम निबंधकाच्या मनमानी कारभारा विरोधात सिल्लोड तहसील कार्यालय समोर आज  एकदिवसीय धरणे आंदोलन करणार.
  -तालुका चिटणीस भाई युनूस पठाण शेतकरी कामगार पक्ष
-------------------------
26 मार्च पासून बेमुदत उपोषण
लाखो रुपये घेऊन बेकायदा दस्त नोंदणी होत आहे. खऱ्या लोकांना त्रास दिला जातोय. सह दुय्यम निबंधक चकलावार, कनिष्ठ लिपिक सागर पवार यांना निलंबित करावे नसता 26 मार्च पासून आमरण उपोषण करण्यात येईल.
- जगदीश बेदवे महासचिव अन्याय अत्याचार हक्क समिती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें