नाशिकच्या घोटी टोलनाक्याजवळ शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन; रस्त्यावर शेतमाल टाकून महामार्ग रोखला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 17 मार्च 2018

नाशिकच्या घोटी टोलनाक्याजवळ शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन; रस्त्यावर शेतमाल टाकून महामार्ग रोखला.

नाशिकच्या घोटी टोलनाक्याजवळ शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन; रस्त्यावर शेतमाल टाकून महामार्ग रोखला.

कोणतीही पूर्वसूचना न देता बाजार समितीचे स्थलांतर केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल महामार्गावर फेकून चक्काजाम आंदोलन केले. गेल्या चार तासापासून हे आंदोलन सुरु आहे. यामुळे नाशिक मुख्य महामार्गावरील वाहतुक खोळंबली आहे.संपप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर टोमॅटो, दुधी भोपळे, फ्लॉवर यांसारख्या फळभाज्या रस्त्यावर फेकून आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे घोटी टोलनाक्याजवळील दोन्ही मार्गांवरील वाहतुक मोठ्या प्रमाणावर खोळंबली आहे. नाशिक ते सिन्नर, सिन्नर ते शिर्डी आणि मुंबई-नाशिक महामार्ग शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे जाम झाला आहे. दरम्यान, कसारा घाटात एक रुग्णवाहिका अडकून पडल्याचे सुत्रांकडून कळते.गेल्या काही वर्षांपासून बाजार समितीत नियमित बाजार सुरु असताना सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसुचना न देता याचे अचानक स्थलांतर केले आहे. शेतकऱ्यांना येथे कोणत्याच सुविधा नाहीत तसेच बाजारासाठी सोयीची जागा नाही. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून शेतमालांना भाव नाही. यामुळे शेतकऱ्यांचा संताप आज अनावर झाला आणि त्यांनी चक्का जाम आंदोलन पुकारले. बाजार समीतीकडे विक्रीसाठी आणलेला माल त्यांनी यावेळी रस्त्यावरफेकून दिला.शेतमाल फेकून दिल्याने आज आमचे नुकसान होईल मात्र त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही, अशी भुमिका हे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान,परिस्थितीवर नियंत्रणासाठी ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून प्रशासनाची प्राथमिक तयारी सुरु करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें