भाजपात गेलेले माऊली थोरात यांची दोनच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घरवापसी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 13 मार्च 2018

भाजपात गेलेले माऊली थोरात यांची दोनच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घरवापसी.

भाजपात गेलेले माऊली थोरात यांची दोनच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घरवापसी.


*जिंतूर/  निशाद आहेमद*

जिंतूर- आज दि.10/3/2018 रोजी भाजपात दाखल झालेले माऊली थोरात दोनच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आ.विजय भांबळे यांच्या उपस्थितीत दाखल झाले आहेत. भारतीय जनता पार्टीत दाखल होऊन एकच दिवस होऊन त्यांना मोठा पश्चाताप झाला, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती पाहता व भाजपा च्या भूलथापा पाहून भाजपला एकाच दिवसात सोड चिठ्ठी दिली. जिंतूर-सेलू तालुक्यात आ.विजय भांवळे यांची विकास कामांची मशाल, व भाजपचे फसवे धोरण यामुळे पुढे भविष्यातही राष्ट्रवादी काँग्रेसलाच महत्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रवेशामुळे भाजप ला जिंतूर सेलू विधांसभेमध्ये मोठा धक्का बसला आहे.
यावेळी जि.प.सभापती अशोक काकडे,जि.प.सदस्य नानासाहेब राऊत,जि.प.सदस्य उबाळे साहेब, शंकर गंजे,तहेसिन देशमूख,ताठे महाराज, उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें