पाथरी तालुक्यातील सावली येथील वृद्ध महिलेचे घर जळले
ग्रामपंचायत आली मदतीला.
स.अहमद आली अन्सारी.प्रतिनिधी / पाथरी : पाथरी तालुक्यातील सावली गावातील वृद्ध महिलेचे घर जळाल्याने तिच्या पुढे मोठे संकट कोसल्यासारखे झाले. हि वृद्ध महिला एकटीच राहत असल्याने मोलमजुरी करून आपली उपजीविका करीत असते. मीराबाई तुळशीराम शेंडे वय (६७) असे वृद्ध महिलेचे नाव असून हि नित्य नियमाप्रमाणे चार वाजताचा सुमारास स्वयंपाक करीत असतांना पाणी फेकण्यास काही क्षणा करीत बाहेर गेली असता चुली जवळ मातीचे तेलाचा दिव्याने पेट घेऊन घरजळायला लागले असता घराजवळील आसपासच्या शेजाऱ्यांनी धाऊन आगीवर पाणी टाकून आटोक्यात आणले. यात वृद्ध महिलेचे कपडे, स्वयंपाकाला लागणारे भांडे, तिने मोल मजुरी करून ठेवलेले धान्य पूर्णता जाळले असून हि माहिती ग्राम पंचायत सरपंचांना माहिती मिळताच सदस्यांसोबत तात्काळ घटनास्थळ गाठून वृद्ध महिलेला ग्रामपंचायत कडून आर्थिक मदत केली व तिचे सात्वन केले. याप्रसंगी सरपंच राजेश सिद्धम, आनंद वालदे रामभाऊ ठिकरे,अनिल मडावी,उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें