पुणे : अल कायदा संघटनेच्या संपर्कातील तिघांना अटक
पुणे : बांगलादेशातील अन्सारउल बांग्ला टीम (एबीटी) या दहशवादी संघटनेच्या तिघांना पुणे दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना भारतात राहण्याची व्यवस्था करत असल्याचे समोर आले आहे.
वानवडी व आकुर्डी भागातून त्यांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून बनावट पॅन, आधार कार्ड व मतदान कार्डन मिळाले आहेत. तिघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तिघांपैकी दोघे खुलना जिल्ह्यातील सतानी येथील आहे. तर, एकजण शरियतपुर जिल्यातील बीराजी कुंडी येथील राहणारे आहेत.
तिघेही घुसखोरीकरून भारतात आले आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून हे तिघे पुण्यात राहत असल्याचे समोर आले आहे. त्यांनी पुण्यात आल्यानंतर बनावट पॅन, आधार व मतदान कार्ड काढले आहेत. त्यांनी बनावट कागदपत्र तयार करून सिम कार्ड घेतले आहेत. त्याद्वारे त्याचा गैरवापरही केल्याचे निष्पन्न झाले आहे.
भारतात बंदी घालण्यात आलेल्या अल कायदा संघटनेच्या फ्रंट ऑर्गनायझेशन असलेल्या दहशतवादी संघटनेतील सक्रिय सदस्यांची भारतात छुप्या पद्धतीने राहण्याची व्यवस्था हे तिघे करत होते. तसेच, त्यांना आर्थिक व विविध प्रकारे दहशतवादी कृत्य करण्यास मदत करत होते. यापैकी एकाला संवदेनशील ठिकाणापासून अटक करण्यात आली आहे...

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें