स्वबळाच्या नाऱ्यानंतरही सेना-भाजप एकत्र. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 17 मार्च 2018

स्वबळाच्या नाऱ्यानंतरही सेना-भाजप एकत्र.

स्वबळाच्या नाऱ्यानंतरही सेना-भाजप एकत्र.


आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार शिवसेनेने केला असला तरी, मुंबई महानगर पालिकेच्या एका प्रभागाच्या पोटनिवडणुकी करिता शिवसेना आणि भाजप एकत्र आले आहेत. ही एकत्र येण्याची नांदी असल्याची चर्चा विधान भवन परिसरात सुरू झाली. मुंबई महानगरपालिकेच्या प्रतीक्षानगर विभागातीलप्रभाग क्र. १७३ मध्ये पोटनिवडणूक होत आहे. शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. या प्रभागात भाजपने पाठिंबा द्यावा म्हणून शिवसेनेचे मंत्री व काही आमदारांनी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर  उपस्थित होते. भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभागात गेल्या डिसेंबर मध्ये पोटनिवडणूक झाली असता शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला होता. शिवसेना नगरसेवकाच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असल्याने या वेळी भाजपने पाठिंबा द्यावा, अशी शिवसेनेची भूमिका होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही भूमिका मान्य केली. या पोटनिवडणुकीत भाजप शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देईल, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी जाहीर केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें