80 हजार शाळा बंद करण्याची भाषा करणार्याची चौकशी करा.धंनजय मुंडे.
मुंबई : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ८० हजार शाळा बंद करण्याची भाषा करणाऱ्या सचिवांची चौकशी करण्याची मागणी आज विधानपरिषदेत केली.
राज्य शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १३०० शाळा बंद करुन त्याचे समायोजन इतर शाळामध्ये करण्याचा निर्णय घेतला. बहुजनांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचे काम सरकार करत आहे असे सांगतानाच समायोजनाच्या नावाखाली सरकारने शाळा बंद करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला. दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठित करुन फेरविचार करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दरम्यान शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी औरंगाबाद येथे एका भाषणात सरकार ८० हजार शाळा बंद करणार असल्याचे बोलले होते त्यामुळे या वक्तव्याची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे राईट टू एज्युकेशन कायद्याचे उल्लंघन होत असून त्याचा पुर्नविचार व्हावा याबाबत शेकापच्या बाळाराम पाटील यांच्यासह विधानपरिषदेमध्ये ४० आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधले.
कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाबाबत विचार करण्यासाठी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. विधानपरिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासात या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावर निर्णय देताना सभापतींनी सदस्यांच्या भावना लक्षात घेता समितीची घोषणा केली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें