गुत्तेदाराचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला.
समशेर खान.विशेष,प्रतिनिधी.
*परतूर तालुक्यातील वरफळ येथील दैठणा (ता. परतूर) शिवारात खून करून मृतदेह खोदकाम सुरू असलेल्या विहिरीत फेकल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी मृताच्या भावाच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गुत्तेदारासह इतर सहा ते सात जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरफळ येथील शेख मुनवर शेख नूर (३८) हाविहीर खोदण्याच्या गुत्तेदारीचे कामकरीत असे त्याचे दैठणा शिवारात विहीरखोदण्याचे काम सुरू होते. दैठणा येथील रमेश तायडे यांनी शेख मुनवर व त्याचा मित्र माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर आढाव यांना गुरुवारी रात्री दैठणा येथे जेवणासाठी बोलावले होते. यावर ते दोघे रात्री शेतात जेवणासाठी आले असता त्या ठिकाणी इतर सहा ते सात जण विहीर खोदकाम करणारे मजूर त्यावेळी तेथे होते. तायडे यांनी दारू व मटनाचा बेत आखला होता. सर्व जण दारू पित असताना तायडे यांनी शेख मुनवर व आढाव यांना बिना पाण्याची दारू पिण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे मुनवर, तायडे व आढाव यांच्यात वाद सुरू झाला होता.त्यामुळे आढाव हे गावाकडे निघून गेलाव मुनवर तेथेच होता. रमेश तायडे व इतरसहा ते सात जणांनी दारू पिण्याच्या आणि गुत्तेदारीच्या कारणावरून शेख मुनवर शेख नूर करून मृतदेह विहिरीत फेकला. या प्रकरणी मृताचा भाऊ शेख सरवर शेख नूर यांच्या फिर्यादीवरून रमेश तायडे, ज्ञानेश्वर आढाव यांच्यासह सहा जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार करीत आहेत.*

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें