- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 9 जनवरी 2018

*अपूर्वा पॉलिटेक्नीक येथे  खो-खो क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण  सोहळा संपन्न*

सेलू , दि.(9) येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित अपूर्वा पॉलिटेक्नीक व IEDSSA जी-२ झोन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खो-खो या क्रीडा स्पर्धेचा  बक्षीस सोहळा पार पडला.कार्यक्रमाचे  अध्यक्ष म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे हे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डाॅ. राम रोडगे बी.एड काॅलेजच्या प्राचार्यां डाॅ. मधुबाला चव्हाण, प्रिन्स अकॅडमीच्या प्राचार्यां प्रिती सॅम्युअल,  अपूर्वा पॉलिटेक्नीकचे प्राचार्य श्री अशोक बोडखे आदि मान्यवर उपस्थित होते. या दोन दिवसीय  चुरसीच्या व अतिटतीच्या झालेल्या सामन्यात विजेते म्हणून ग्रामीण पॉलिटेक्नीक नांदेडच्या संघाने बाजी मारली,तर उपविजेते म्हणून गव्हरमेंट पॉलिटेक्नीक हिंगोली ठरले. विजेत्या व उपविजेत्या संघाला श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, अपूर्वा पॉलिटेकनीकचे प्राचार्य श्री अशोक बोडखे यांच्या हस्ते परोतोषिक व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेचे पंच म्हणून खुद्दुस झुलाह,श्री रामप्रसाद धर्मे यांनी जबाबदारी पार पाडली.खेळाचे धावते वर्णन श्री श्याम शेळके,श्री दिगंबर टाके यांनी केले.व गुणलेखक म्हणून प्रा.उल्हास राठोड,नुमान सर यांनी काम पहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.मधुकर इगोले यांनी केले तर अभार प्रदर्शन प्रा.नारायण व्यवहारे यांनी केले.स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा.विष्णू ताठे,प्रा.सय्यद  प्रा.चौरे,प्रा.खारगे,प्रा.निर्वळ,प्रा.फंड,प्रा.फंड व  अपूर्वा पॉलिटेकनीकच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर वृदानी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें