भुजबळ यांच्या सुटकेसाठी सेलूत धरणे आंदोलन
◆राजकीय व सामाजिक संघटनाचा पाठींबा
समशेर खान
सेलू(प्रतिनधी): राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,माजी खासदार समीर भुजबळ यांना चौकशी यंत्रणेने मागील २२ महिन्या पासून ताब्यात घेतले आहे. त्यांची तत्काळ कारागृहातून सुटका करण्यात यावी या मागणी साठी शहरतील तहसील कार्यालय परिसरात मंगळवार २ जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या वेळी अनेक राजकिय व सामजिक संघटनाच्या पदाधिकार्यांनी सहभाग नोंदवून पाठींबा दर्शविला. उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी तर तहसील प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या स्वतंत्र निवेदनात आलेल्या म्हटले आहे की छगन भुजबळ हे तमाम बहुजन समाजाचे आशास्थान आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपाखाली मागील २२ महिन्यापासून चौकशी यंत्रणांनी त्यांना कारागृहात ठेवले आहे.जामीन न देणारा कायदा घटनाबाह्य असल्याचे नुकतेच न्यायालयाने स्पष्ट केले आहे. असे असताना आकसापोटी त्यांना कारागृहात ठेवण्यात आले आहे .अद्यापपर्यंत त्यांचा दोष सिद्ध झाला नाही .केवळ सूड बुद्धीने त्यांच्या वर कारवाही करण्यात आली असल्या कारणाने त्यांची सुटका करून त्यांना न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या साठी जि.प.सदस्य नानासाहेब राऊत याच्या नेत्रत्वा खाली धरने आंदोलन करण्यातआले , यावेळी सर्वपक्षीय पदाधिका -यासह सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला यामध्ये भाजपाचे संजय साडेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने, प.स.सभापती पुरुषोत्तम पावडे, रा.काँ.तालुकाकार्याध्यक्ष सुधाकर रोकडे , माजीनगराध्यक्ष सुरेश कोरडे, विलास
सोनवणे ,सुदाम कटारे,राम सोनवणे ,अँड.प्रभाकर गिराम,अँड.बालासाहेब रोडगे, रमेश माने, विठ्ठल कोकर,राधकीशन महाराज हिस्सीकर, पंडित रासवे महाराज,पवन कटारे,अर्जुन बोरूळ ,प्रभाकर जवळकर ,सुनील कटारे ,प्रभाकर इंगळे ,भागवत दळवे ,विनोद तरटे, तुकाराम गायकवाड,गणेश गोरे, बाळासाहेब काजळे, बि.डी .चिंचाणे,गव्हाडे,आदि सह अनेकांनी पुढाकार घेतला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें