- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 15 जनवरी 2018

दै.पुढारीचा वर्धापन दिन साजरा
-----------------------------
मकरसंक्रांती निमित्त तिळगुळाचे वाटप
-------------------------------------
सोनपेठ (राजेश खेडकर)
सोनपेठ शहर व तालुक्यातील अत्यल्प कालावधित लोकप्रियता मिळविले व सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र  दैनिक पुढारीचा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. दै.पुढारीने परभणी जिल्हा आवृत्ती गेल्यावर्षी ०१ जून २०१७ रोजी सुरु केली. या आवृत्तीस वाचक वर्गातुन प्रचंड प्रतिसाद लाभला असुन केवळ सोनपेठ शहरातच याचे ४५० तर तालुक्यातील एकुण ग्राहकांची ११०० येवढी संख्या झाली आहे. वाचकांसी असलेले आपुलकीचे संबंध अधिक घट्ट होन्यासाठी व वृतपत्र मिळण्यातील अडीअडचनी जानुन घेण्यासाठी आज सकाळी शहरातील कांही वाचकांशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता; दै.पुढारीच्या दर्जा बाबत व पेपर वेळेवर घरपोंच मिळत असल्याबाबत ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी व मकरसंक्रांतीचे औचित्य साधुन निमित्त दै.पुढारी वृत्तपत्र समुहाच्या वतीने सर्व वाचकांना तीळगुळाची भेट देण्यात आली.
यावेळी सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष तथा तेज न्युज 24चे तालुका प्रतिनिधी राजेश खेडकर, डिगांबर गाजरे, शिवाजी कुंभारीकर वृत्तपत्र वितरक संघटनेचे अध्यक्ष तथा दै.पुढारी चे वितरक रामेश्वर पोटे, संघटनेचे उपाध्यक्ष माधव जगताप, साप्ताहिक सोनपेठ दर्शन चे संपादक किरण स्वामी दै.पुढारी चे तालुका प्रतिनिधी राधेश्याम वर्मा आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें