मानवत येथील कोक्कर कॉलनी येथे डॉ.अंकुश लाड याच्या हस्ते नाली व रोडच्या कामाचे उदघाटन .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०१: मानवत शहरातील कोक्कर कॉलनी येथे २० लाख रुपयाच्या नाली व रोडच्या विकासकामाचे उदघाटन नववर्षाच्या शुभमुहर्तावर आज दि.१ जानेवारी रोजी युवानेते डॉ.अंकुश लाड याच्या शुभहस्ते करण्यात आले.
मानवत शहरातील कोक्कर कॉलनी येथे गेल्या अनेक वर्षापासुन नाली व रस्त्याची कामे प्रलंबीत होती.परिसरातील नागरिक अनेक दिवसापासुन आपल्या परिसरामध्ये रस्ते व नाली व्हावेत अशी मागणी करत होते.तसेच मागील काहि दिवसापुर्वी परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने युवानेते डॉ.अंकुश लाड याची भेट घेऊन परिसरामध्ये रस्ते व नाली व्हावेत यांची मागणी केली होती.या मागणीनुसार युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी लक्ष देत मानवत नगरपरिषदच्या रोड फंडातुन रस्ते व नालीसाठी २० लाख रुपये उपलब्ध करुन दिलेत व आज दि.१ जानेवारी रोजी परिसरातील नागरिकाच्या मागणीचा विचार करुन रस्ते व नाली कामाचे उदघाटन युवानेते डॉ.अंकुश लाड याच्यां हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेवक जमील चाऊस,यशभैय्या कञुवार ,दत्ता चौधरी ,विनोद राहाटे,राजुभैय्या खरात आदीसह मोठ्याप्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थीत होते.
सोमवार, 1 जनवरी 2018
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें