- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 30 जनवरी 2018

शाळा हा गावचा आरसा असतो
   मधुकर काष्टे

दि 29 जाने रोजी तालुक्यातील जि.प.शाळा केमापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषण करतांना मधुकर काष्टे म्हणाले की शाळा हा गावचा आरसा असतो .गाव जितके चांगले असेल तितक्याच प्रमाणात गावची शाळा चांगली असते.गावक-यांनी नेहमी शाळेला सहकार्य करावे. शाळेचा विकास झाला तरच आपल्या विद्यार्थ्यांचा आणि गावाचा विकास होऊ शकतो. या गावचे सहकार्य असल्यामुळेच आज केमापूर शाळा एक आदर्श शाळा निर्माण झाली आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून निवेदक सुभाष मोहकरे हे होते यावेळी बोलतांना ते म्हणाले की अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून निश्चित टि.व्ही. कलाकार घडतील  तेवढी गुणवत्ता या विद्यार्थ्यां मध्ये आहे.यावेळी त्यांनी माता पालकांनाही मार्गदर्शन केले आणि मुलांच्या गुणवत्ता विकासासाठी आपण  कसे प्रयत्न करावे हे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर काष्टे केंद्र प्रमुख कुपटा,प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष मोहकरे, किशन कटारे तर व्यासपीठावर  सरपंच उषा गुठ्ठे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिंधू केंद्रे ,गुजाबाई पवार ,अर्चना आंधळे, शारदा आंधळे ह्या होत्या.
यावेळी शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर बहारदार व दिलखेचक नृत्य सादर करून पाहुण्यांची व गावक-यांची वाहवा मिळवली. *सरपंच उषाताई गुठ्ठे यांनी पक्का रंगमंच बांधून देण्याचे आश्वासन दिले त्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला*
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शरद ठाकर यांनी केले,सुत्रसंचलन प्रणिता गाडे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर ईघारे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिगंबर रोकडे,दगडोबा माघाडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

++दिपप्रज्वलन करतांना सरपंच उषाताई गुठ्ठे, मधुकर काष्टे (केंद्र प्रमुख ), सुभाष मोहकरे, शरद ठाकर(मुख्याध्यापक), किशन कटारे, सिंधू केंद्रे( अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती)  गुजाबाई पवार, अर्चना आंधळे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें