- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 12 दिसंबर 2017

                 *दिवसभरातल्या*

              *हेडलाईन्सवर एक नजर*

   
💢 उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेत उस्मानाबाद जिल्ह्यातील ३४ हजार ५९९ शेतकऱ्यांना १७५ कोटी १० लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे...

💢 नागपूर : असहकार पुकारा, सरकारी बिलं भरु नका, शरद पवार यांचं आवाहन, अंगठ्याच्या ऑपरेशननंतरही पवारांची नागपुरातील जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाला हजेरी..

💢 नागपूर : विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळांतर्गत येणाऱ्या गोसेखूर्द सिंचन घोटाळ्याप्रकरणी नागपूर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पुढील तपास सुरू...

💢 राज्यात बैलगाडी शर्यतींवर तूर्तास बंदीच, हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती नाही...

💢 पुण्यात बेबी डायपरमधून सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश, 18 लाखाचं सोनं जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई...

💢 सांगली : अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी निलंबित PSI कामटेच्या मामेसासऱ्याला अटक, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याचा आरोप

💢 मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती कायम, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल, मराठी शाळांची स्थिती अत्यंत खराब...

💢 सोलापूर : दोन मुली व पत्नीची दगडाने ठेचून हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडली...

💢 अमरावती : मनपा पशु शल्यचिकित्सकाची आत्महत्या; वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा पत्नीचा आरोप...

💢 जळगाव : वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत एका नाराज झालेल्या मनसेच्या नितीन नन्नवरे या नगरसेवकानं उपायुक्त चंद्रकांत खोसे यांच्या गळ्यात बटाट्याची माळ घालण्याचा केला प्रयत्न...

💢 गडचिरोली :कल्लेडच्या जंगलातील देचली पेठा परिसरात आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला, 6 डिसेंबरला त्याच भागात झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी मारले गेले होते...

💢 आमदार-खासदारांशी संबंधित विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी 12 विशेष न्यायालये स्थापन करणार असल्याची केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला माहिती...

💢 नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये किरकोळ बाजारातील महागाईचा दर वाढून 4.88 टक्क्यांवर, ऑक्टोबर महिन्यात 3.58 टक्क्यांवर होता महागाई दर..

💢 औरंगाबाद : तिरुअनंतपुरम येथे आयोजित ६१व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी औरंगाबादेतील एमजीएम नेमबाजी प्रशिक्षण केंद्राच्या २० नेमबाजांची निवड...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~______

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें