शिर्डी प्रतिनिधी
कोपरगाव- मतिमंद मुलीच्या मंदपणाचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोघांना न्यायालयाने २० वर्षं सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
रमेश म्हसु जाधव, देशमुख,किरण भागवत कदम,असे शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
न्यायाधीश आर.बी.भागवत यांनी हा निकाल दिला.
रमेश जाधव व किराण कदम या दोघांनी पिडीत मुलगी ही मतिमंद असल्याचा फायदा घेतला.मुलीच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.पिडीतेवर वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला ही मुलगी पाच महीन्याची गरोदर राहिली असल्याची तक्रार कोपरगाव पोलिसांकडे केली.तात्कालीन सहायक निरीक्षक पी.वाय.कान्द्री यांनी तपासावरुन आरोपींना न्यायालयात दाखल केले.
साक्षी पुराव्यांवर न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें