![]() |
| संग्रहित |
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे. बुधवारी पहाटेपासून अनंतनाग येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. चकमक संपल्याची घोषणा करण्यात आली असली तरी अद्याप परिसरात लष्कराकडून शोधमोहिम सुरू आहे. येथे आणखीकाही दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम अजून सुरू आहे.अनंतनागच्या कोटल्ला मोहल्ला परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पहाटेच परिसराला घेरलं. सुरक्षारक्षकांनी घेराव घातल्याचं लक्षात येताच दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरूवात केली. दहशतवाद्यांवर हल्ला करण्याआधी सुरक्षा रक्षकांनी परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं होतं.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें