येडियुरप्पा यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 17 मई 2018

येडियुरप्पा यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

येडियुरप्पा यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


नवी दिल्ली .
सुप्रीम कोर्टामध्ये मध्यरात्री ते पहाटे पाच वाजेपर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर आज सकाळी 9 वाजता बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुरुवारी पहाटे पाच वाजेपर्यंत चाललेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकातील शपथविधी रोखण्यास नकार दिला. त्याचवेळी भाजपकडून समर्थक आमदारांची यादी मागविण्यात आली आहे़. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने  मध्यरात्री ऐतिहासिक सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयाने मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे पाचपर्यंत दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, काँग्रेसची मागणी अमान्य केली. तसेच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार यांच्या शपथविधीला हिरवा कंदिल दाखवला. त्यामुळे बी एस येडियुरप्पा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत.


शपथविधी रोखण्यास न्यायालयाने नकार दिला तरी  भाजपपुढील अडथळा अजून कमी झालेला नाही. कारण न्यायालयाने येडियुरप्पांना शपथविधीसाठी हिरवा कंदिल दाखवला असला, तरी समर्थक आमदारांची यादीही मागवली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. येडियुरप्पांच्या शपथविधीला विरोध करत काँग्रेस-जेडीएसने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राज्यपालांनी येडीयुरप्पांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण देताच काँग्रेसने रात्री उशिरा न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने रात्री पावणे दोन ते तब्बल पहाटे पाचपर्यंत दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडली.

एखाद्या पक्षाला सत्तास्थापनेचे निमंत्रण देणे हा राज्यपालांचा विशेषाधिकार आहे, असं म्हणत यात हस्तक्षेपास न्यायालयाने नकार दिला. व  पुढील सुनावणी उद्या सकाळी १० वाजता ठेवली आहे. त्यामुळे येडियुरप्पांचा आज सकाळी ९ वाजता होणारा शपथविधी सोहळा पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. काँग्रेस नेते आणि वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी काँग्रेस-जेडीएसच्यावतीने खंडपीठासमोर आपली बाजू मांडली. तर भाजपाकडून मुकुल रोहतगी तर केंद्र सरकारच्यावतीनं वकिल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली़.
शपथविधी रोखण्यास नकार देऊन कोर्टाकडून भाजपला दिलासा मिळाला असला तरी भाजपचा मार्ग सुकर झाला असं नाही. कारण, न्यायालयाने भाजपकडून समर्थक आमदारांची यादी मागितली आहे.  त्याबाबत उद्या पुन्हा साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे.  त्यामुळे भाजप बहुमताचा आकडा कशा पद्धतीनं जुळवणार हा ही एक प्रश्न आहे.
कर्नाटकात बहुमताचा आकडा ११२ इतका आहे. मात्र सध्या भाजपकडे १०४ आणि एक अपक्ष असे एकूण १०५ आमदारांचं संख्याबळ आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल २०१८
भाजप १०४
काँग्रेस ७८
जनता दल (सेक्युलर) ३७
बहुजन समाज पार्टी १
कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी १
अपक्ष १

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें