भाजपाच्या सोनपेठ तालुका उपाध्यक्षपदी बाबासाहेब गर्जे.
पक्षाने दाखविलेल्या विश्वासास साजेसे कार्य करिल: गर्जे.
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१५एप्रिल २०१८
भारतीय जनता पार्टी च्या सोनपेठ तालुका उपाध्यक्ष पदी तालूक्यातील धार डिघोळ येथील धडाडीचे भाजपा कार्यकर्ते बाबासाहेब व्यंकटराव गर्जे यांची निवड करण्यात आली असुन रविवार दि.१५ रोजी सोनपेठ येथील एका कार्यक्रम प्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचे हस्ते त्यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले.
परिसरात भजपाच्या विचारसरणीची पेरणी करून, गेली आनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठेने काम केल्याचे पाहुन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांचे सुचनेवरुन तालुकाध्यक्ष महादेव गिरे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडीचे रमाकांत जहागीरदार, बालाप्रसाद मुंदडा, शिवाजी मव्हाळे, अशोक मुळे, बाबा पवार, अजीत देशमुख, सुभाष सावंत, माधव चौधरी, रंगनाथ सोळंके, ग्रामस्थ व मित्र परिवारांतून अभीनंदन करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें