कॅडल मार्चने ढवळून निघाले सेलू शहर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 21 अप्रैल 2018

कॅडल मार्चने ढवळून निघाले सेलू शहर.

कॅडल मार्चने ढवळून निघाले सेलू शहर.




सेलू :- आम्ही कुठेही गेलो तरी घाणेरड्या नजरा पाठलाग करतात.....गर्दीत जाणिवपुर्वक केले जाणारे स्पर्शही जीव उबवून टाकतात.....त्या नजरा अन् नकोशा स्पर्शातून रोजच बलात्कार होत आहेत, मुलगी म्हणून जन्म घेतला हीच आमची चुक आहे का असा संतप्त सवाल कठुआ, उन्नाव, धनेगाव अत्याचाराचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरूणाईने गुरूवारी केला.
जम्मू काश्मीर मधील आठ वर्षीय चिमुरड्या आसिफाची बलात्कारानंतर निर्घृण हत्या केली. या व उन्नाव, सुरत आणि सेलू तालूक्यातील धनेगाव येथील घटनेचा निषेधार्थ सेलू शहरात तरूणाईने उत्सफुर्तपणे रस्त्यावर उतरत कॅडल मार्च काढला. या कॅडल मार्चची सुरूवात टिळक पुतळ्या पासुन करण्यात आली. तर समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत महिला व मुलींनी सरकारच्या नाकर्तेपणाचा धिक्कार करत आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. आसिफाला न्याय द्या, मोदी सरकार होश मे आओ असे फलक कॅडल मार्चमध्ये दिसून आले. या कॅडल मार्चमध्ये लोकप्रतिनिधीसह, सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें