सामान्य रुग्णालयातील बाल रुग्ण इमारतीची दुरवस्था मूळे रुग्णांचे हाल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 14 नवंबर 2019

सामान्य रुग्णालयातील बाल रुग्ण इमारतीची दुरवस्था मूळे रुग्णांचे हाल.

प्रतिनिधी.दि.14/11/2019.
परभणी :जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग कक्षात रुग्णांची व नातेवाईकांची होणीरी हेळसांड गैरसोय होत  असल्याची तक्रार मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती या निवेदनात असे कळविण्यात आले होते की येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ६ कोटी ८८ लाख रुपये खर्च करुन वर्षभरापूर्वी बांधलेल्या बाल रुग्ण विभाग आणि प्रशासकीय इमारतीची एका वर्षातच दुरवस्था झाली असून, नव्याचे नऊ दिवसही या इमारतीचे नाविण्य टिकले नसल्याने रुग्णांची गैरसोय मात्र कायम आहे.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या मोठी असल्याने विविध विभागांसाठी स्वतंत्र इमारत बांधकामाचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मनोरुग्ण विभाग, कैदी विभाग आणि बालरुग्णांसाठी स्वतंत्र तीन मजली इमारत बांधकामास मंजुरी मिळाली. रुग्णांसाठी इमारती बरोबरच प्रशासकीय कामकाजासाठीही तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या दोन्ही इमारतींचा खर्च साधारणत: ६ कोटी ८८ लाख ६८ हजार रुपयांपर्यंत गेला आहे. साधारणत: वर्षभरापूर्वी बाल रुग्ण इमारत जिल्हा सामान्य रुग्णालयास हस्तांतरित करण्यात आली. या ठिकाणी सध्या पुरुष वैद्यकीय कक्ष, बाल संगोपन कक्ष आणि बाल पोषण पुनर्वसन केंद्र चालविले जाते.
प्रवेशद्वारापासूनच या इमारतीची दुरवस्था झाली आहे. तीन मजली इमारतीसाठी बसविलेली लिफ्ट उद्घाटनापासून आजपर्यंत सुरू नसून, केवळ लिफ्टचा सांगाडा तेवढा उभा आहे. जागोजागी फरशी उखडली असून, इमारतीच्या जिन्यावरील भिंतीला लावलेल्या फरश्याही निखळून पडल्या आहेत. पहिल्याच मजल्याच्या खिडक्या व भिंती गुटखा, पान खाऊन थुंकल्याने घाणीने बरबटल्या असल्याचे दिसून आले. खिडक्यांची तावदानेही तुटले आहेत. एक वर्षातच या इमारतीची पार दुरवस्था झाली आहे. दुसऱ्या आणि बालरोग पक्ष असलेल्या तिसऱ्या मजल्याची अवस्थाही अत्यंत वाईट आहे एका वर्षातच या इमारतीची दुरवस्था झाल्याने रुग्णांना सोबत असलेल्या नातेवाईकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे या रुग्णालयात खाटांची संख्या कमी असल्याने एका खाटावर तीन चमकल्यावर उपचार करण्यात येत आहे तसेच लिफ्ट मशीन बंद, पिण्याचे पाणीची व्यवस्था नसल्याने रुग्णांना पाणी विकत घ्यावे लागते व शौचालयाचे घान पाणी बाहेर येत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरल्यामुळे रुग्णांची व नातेवाईक त्यांचे हाल होत आहे नवीन इमारतींना लवकर मंजुरी मिळत नाही. मंजुरी मिळाली तर निधी मिळत नाही,अशी स्थिती असताना मंजुरी व निधी मिळाल्यानंतरही इमारत बांधकाम निकृष्ट झाल्याने त्याचा त्रास रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे.
नियंत्रण नसल्याने निकृष्ट काम
४ जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने बांधलेल्या दोन्ही इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. एका वर्षातच या इमारतींची दुरवस्था झाल्याने कामाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हे बांधकाम झाले आहे. मात्र एका वर्षातच फरश्या उखडणे, खिडक्यांच्या काचा तुटणे, स्लॅब उखडल्याने या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याचे नियंत्रण नसल्याचेच दिसून येत आहे. किमान आरोग्याच्या संदर्भातील इमारत बांधकाम करताना दर्जा राखणे आवश्यक होते.मात्र त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे.
हस्तांतरणास केला विरोध
४ जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात बांधलेल्या या दोन्ही इमारतींचे बांधकाम निकृष्ट झाल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या इमारती ताब्यात घेण्यास विरोध केला होता मात्र रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन बाल रुग्ण विभागाची इमारत हस्तांतरित करुन घेण्यात आली. प्रशासकीय इमारत मात्र निकृष्ट कामांमुळेच अद्यापही रुग्णालय प्रशासनाने हस्तांतरित करुन घेतली नाही या इमारतीतील कामांचा दर्जा राखावा आणि त्यानंतरच इमारत हस्तांतरित करुन घेतली जाईल, असे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने बांधकाम विभागाला कळविले आहे.विशेष म्हणजे, सध्या या इमारतीतच सामान्य रुग्णालय प्रशासनाचे कामकाज सुरू झाले आहे.
जागोजागी कचऱ्याचे ढिगारे आसुन बाल रुग्ण इमारतीच्या जिन्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. इमारत परिसरात स्वच्छताही अभावानेच केली जात असल्याचे दिसून आले. इमारतीच्या प्रत्येक भिंती गुटख्याच्या पिचकार्यांनीच रंगल्या आहेत बाल पोषण केंद्र चालविल्या जाणाऱ्या इमारतीत एवढी अस्वच्छता असेल तर बालकांचे आरोग्य कसे सुदृढ राहील, असा प्रश्न पडतो. शुद्ध पाण्यासाठी लावलेले मशीनही बंद पडल्याचे दिसून आले यामुळे लहान मुलांना पिण्याच्या पाणी विकत घ्यावे लागते आधी व्यवस्था झाली असून या विरुद्ध तक्रार मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने  जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली आह आहे जिल्हाधिकार्‍यांनी या प्रश्नी गंभीरतेने दखल घेऊन दिनांक अठरा रोजी जिल्हा शल्य चिकित्सक सोबत संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक  उप जिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्या दालनात होणार आहे या चलते सामान्य रुग्णालयात समस्यावर चर्चा करून तोडगा निघेल व रुग्णांची होणारी हेळसांड थांबणार आहे असे मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें