सराटी गावचा पाणी पुरवठा अद्यापही बंदच ; चार - पाच महिन्यांपासून महिलांना डोक्यावर आणावे लागते पाणी; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 14 नवंबर 2019

सराटी गावचा पाणी पुरवठा अद्यापही बंदच ; चार - पाच महिन्यांपासून महिलांना डोक्यावर आणावे लागते पाणी;

विद्यूत डि.पी.संच प्रश्न मार्गी लागणार कधी ?

सिल्लोड (प्रतिनिधी)दि 14/11/2019.
सिल्लोड तालुक्यातील सराटी - बाळापुर पाझर तलाव तुडूंब भरला असुन सराटी - बोदवड गावांसाठी पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या पाझर तलावातील दोन्ही विहिरींसह पंप हाऊसही खोलवर पाण्यात बुडाले आहे. पंप घरांच्याही चोहोबाजुंनी पाणी आहे. पाणीपुरवठा विहीरींजवळील विद्यूत डि. पी. संचही पाण्यात बुडाल्याने डि.पी. संच बंद करण्यात आला आहे. सराटी - बोदवड गावांचा पाणी पुरवठा बंद पडल्याचा प्रश्न आमसभेत उपस्थित करताच माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी विद्यूत डि. पी.संच प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सुचनाही महावितरणचे उपविभागीय अधिकारी अधिकार यांना दिल्या होत्या पण अद्यापही पाण्यात बुडालेले विद्यूत डि. पी. संच पर्यायी जागेवर बसविण्यात आलेले नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून पाझर तलावाच्या खाली दोन पाणी पुरवठा विहिरी आहेत .सदरील विहिरीवरील विद्यूत पंप तसेच पाईप लाईन दुरुस्ती कामे केल्यास गावातील पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत असतांना ग्रामपंचायतीकडूनही दुर्लक्षच करण्यात येत असल्याने चार - पाच महिन्यांपासून महिलांना गावालगतच्या विहिरीहून पाणी उपसुन आणावे लागत असल्याने सराटी येथील नागरिकांमधून नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे.
सिल्लोड तालुक्यातील सराटी - बाळापुर पाझर तलाव तुडूंब भरला असुन सराटी गावासाठी पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा विहीरींना पाण्याचा वेढा बसला असुन पावसाचे पाणी या विहीरींमध्ये घुसले आहे.येथील पाझर तलाव भरल्याने सराटी येथील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असला तरी विद्यूत डि. पी.संच पाण्यात बुडाल्याने विद्यूत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पाणी पुरवठा बंद पडल्याने सराटी येथील महिलांना गावालगतच्या विहिरींहून चार - पाच महिन्यांपासून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे.
महावितरण तसेच काॅन्ट्रॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन्ही विद्यूत डि.पी.संच पाझर तलावाच्या बुडीत क्षेत्रात बसविण्यात आल्याने पाझर तलाव तुडूंब भरला असल्याने दोन्ही विद्यूत डि.पी.संच पाण्यात बुडाले आहे. दोन्ही विद्यूत डि.पी. संच पाण्यात बुडाल्याने काॅन्ट्रक्टर - अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळेच हि समस्या उद्भवली आहे.
सराटी गावासाठी या पाझर तलावाखाली दोन जुन्या पाणी पुरवठा विहिरी आहे. या विहीरींवरील मोटार पंप तसेच पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्ती केल्यास पर्यायी पाणी पुरवठा व्यवस्थाही केली जाऊ शकते. पण ग्रामपंचायत पर्यायी पाणी पुरवठा व्यवस्था करण्यातही अपयशीच ठरत असल्याने सराटी येथील नागरिकांमधून नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें