सोनपेठ मंजूर मूल्ला / राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चारही टप्याचे मतदान पार पडल्या आहेत. मतदान झालेल्या परभणी मतदारसंघात कोण निवडून येणार याची चर्चा पहायला मिळत आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार खासदार होणार याबाबत ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठात चर्चा रंगत आहे. गावातील पारावर आता मतांची जुळवाजुळवी सुरू झाली असून उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
परभणी मतदारसंघात तिरंगी लढत झाली असुन यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी असे तिन पक्षाकडून उमेदवार निवडणूकीत उतरले होती.तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानी सभा काँर्नर सभा रैली काढून आपल्या उमेदवार करता जनतेला मते मागितले जनते पण भर उन्हातही रांगेत उभे राहुन मतदान केले सध्या पार पडलेल्या निवडणूकीत ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण असताना. पिण्याच्या पाण्याच्या टंकरच्या लाईनीत व तसेच शेतात कामे नसल्याने गावकरी गावच्या समाजमंदिर असो किंवा शहरातील हाँटेल पान टप-याच्या ठिकाणी गप्पागोष्टीत रंगलेले पहायला मिळत आहे. गावा गावात शहरात सध्या परभणीच्या निवडणुकीच्या चर्चा रंगत आहे. गावातील तरूण आणि वृद्ध यांच्यात मतांच्या जुळवाजुळवी वरून खटके उडत आहे. आपलाच नेता निवडून येणार असे ठासून सांगणारे कार्यकर्ते सुद्धा या चर्चेत सामील होत आहेत.
चौकाचौकांत आणि गल्लीबोळामध्ये उमेदवारांच्या जय-पराजयावर जोरदार विचारमंथन सुरू आहे. २३ मे रोजी निकाल लागणार असल्याने तोपर्यंत अशाच चर्चा सुरु राहणार आहे. आपलाच उमेदवार निवडून येणार हे पटवून देताना पैजा आणि ईर्षा टोकाला जाऊ लागल्या आहेत. निवडणूक कोणतीही असली तरी सामान्य जनतेला आणि विशेषत: राजकीय आवड असलेल्या लोकांना पुल टाईमपासच असते.
ग्रामीण भागात राजकारण प्रत्येकाच्या नसानसात भिनलेले आहे, आसे चित्र चर्चा होताना दिसु लागले आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आहे. निकाल हाती येण्यासाठी अजून 23 दिवस लागणार आहे, मात्र तोपर्यंत उमेदवार जनतेच्या भेटी गाठी घेत आहे तर कार्यकर्ते आप-आपली गणिते चाय पाणी पित माडंत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें