◆सिडबाँम्ब पेरणीचा शुभारंभ.
◆तर बाल वारक-यांना फराळ वाटप
सेलु(प्रतिनिधि):मराठवाड्याच्या दौ-यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवार 23 रोजी शेतकरी मदत केंद्र व बाल वारक-यांना फराळाचे वाटप केले. शहरातील विद्यानगर परिसरात असलेल्या जनतासेवा केंद्रात शेतकरी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष गणेश भिसे यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेले शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन ठाकरे यांनी केले. तसेच पर्यावरण बचाव मोहिमेतील तयार करण्यात येत असलेल्या सिडबाँम्ब कार्यशाळेला भेट देवुन पर्यावरण बचाव मोहिमेची माहिती घेतली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शेख राज, शेतकरी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष गणेश भिसे, निजलिंग अप्पा तरवडगे, गणेश निवळकर, गुलाबराव रोडगे, गणेशराव बोराडे, शंकर लिंगायत राजाभाऊ मोगल आदींची उपस्थिति होती. मनसेच्यावतिने पर्यावरण बचाव मोहिमे अंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी एक लाख सिडबाँम्ब पेरण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध फळ झाडांच्या बिया एकत्र करुन त्यावर प्रक्रिया करुन हे सिडबाँम्ब माळरान व रस्त्याच्या दुतर्फा पेरण्यात येत आहेत. या मोहिमेची राज ठाकरे यांनी पदाधिकारी यांच्याकडुन माहीती घेतली. त्यानंतर रायगड काँर्नर येथे मराठवाड्याच्या दौ-यावर असलेले राज ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशी निमित्त जिल्हाध्यक्ष शेख राज यांनी आयोजीत केलेल्या फराळ वाटपाचा कार्यक्रम ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मोठ्यासंख्येने कार्यकर्त्यासह,युवकांची उपस्थिती होती. मात्र स्वागत स्विकारुन व फराळाचे वाटप करुन राज ठाकरे यांनी कार्यक्रम आटोपता घेत परभणी येथे नियोजित कार्यक्रामच्या दिशेने निघुन गेले. संवाद न साधल्यामुळे मात्र कार्यकर्त्यांना हिरमोड झाला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें