सोनपेठ तालुक्यातील दोन शिक्षकांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 30 जून 2018

सोनपेठ तालुक्यातील दोन शिक्षकांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि. ३०जून २०१८
सोनपेठ शहर व तालुक्यातील दोन शिक्षकांना आज सेवानिवृत्ती बद्दल शाळांच्यावतीने निरोप देण्यात आला.
सोनपेठ शहरातील श्री महालिंगेश्वर विद्यालयाचे राज्यस्तरीय कला शिक्षक पुरस्कार प्राप्त  सहशिक्षक एन. व्ही. स्वामी हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यामुळे श्री. स्वामी यांना आज शाळेच्यावतीने निरोप देण्यात आला. यावेळी शहरातील मान्यवर, विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच प्रकारचा निरोप समारंभ तालुक्यातील शेळगाव येथील जिल्हा परिषद प्रशाळेतही संपन्न झाला. याशाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर चिमणाजी कांबळे हे ही आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे शाळेच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला  यावेळी कार्यक्रमास गावातील मान्यवर, शाळेचे आजी माजी विद्यार्थी, शिक्षक आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें