"कुत्रे पिसाळले की ते ठेचूनच काढावेत."
लेखक:- दादासाहेब श्रीकिसन थेटे
(प्रत्येक मुलीच्या बापासाठी)
असिफा... माफ कर आम्हा सगळ्यांना..! मुर्दाड आणि नामर्द झालेत सगळे..! हैवानाच्या तावडीत गाफील झालेत इथले दगडाचे देव आणि पोटभरू धर्म सारे..! आमच्या निषेधानं तुझ्या आईच्या अश्रूंना कोरड थोडीच पडणार आहे... आमच्या मेणबत्त्या कितीही पेटल्या तरी तुझ्या घरात पडलेला अंधार त्या मेणबत्त्यान थोडीच विझनार आहे... आम्ही कितीही अशांत झालो तरी तुझ्या अबुच्या मनातला असंतोषाचा वणवा शांत थोडाच होणार आहे...! आम्ही सारे नाटकीच आहोत ग.. निमित्ता निमित्ताने जागणारे "नौटंकी"...! आम्हाला वाईट वाटलं नाही; असं नाही बरं..! पण वाटण्यापलीकडे आमचा पुरुषार्थ कधी ओलांडल्याच जात नाही हेही तितकंच खरं..! आता बलात्कारी तेवढेच मर्द उरलेत बहुतेक या जगात. कारण नामर्द झालेत बाकी सगळेच या सैतानांच्याच दहशदीमध्ये..!
हे पहिल्यांदाच झालं नाही गं,इथं रोजचं होतंय हे सारं.. निर्भया, श्रद्धा यांचं काय झालं? त्यांच्या आर्त किंकाळ्या अजून घुमत असतील त्यांच्या आई बापाच्या मनात.. यानंतर घुमतील त्याच किंकाळ्या तुझ्याही आई बाबांच्या कानात.. आणि आम्ही मात्र कालांतराने परत तसेच बहिरे होऊ जसे सातत्यानं होत आलोत... पुढची एक असिफाची घटना होईपर्यंत..!
माझी मुलगी अगदी तुझ्याएवढीच आहे ग.. तुझ्यासारखेच बोलके डोळे आहेत तिचेही.. तू जसा तुझ्या बाबाजवळ हट्ट धरत असशील ना;तसाच हट्ट धरते ती माझ्या जवळ. तुझ्यासारखेच निरागस विश्व आहे तिचं. बाहुल्या आणि लुटुपुटूच्या खेळाचं..! डोरोमोंन आणि मोटू पतलु सारखं कार्टून पाहण्यात तिलाही आनंद वाटतो, जसा तुला वाटतं असेल. जगात फक्त आनंदच असतो असं आज तिला वाटतं असेल; जस कालपर्यंत तुला वाटायचं..! तुझी नि तिची ओळख नाही; जर असती ना तर कदाचित तुझी चांगली मैत्रीण झाली असती ती. आज तिची तुझ्याशी ओळख करून देताना माझे हात थरथरत होते. "पप्पा कोण ही पोरगी? काय झालंय तिला..?" असा तिच्या निरागस मनाला पडलेला प्रश्न तिनं मला विचारताच, मी काहीवेळासाठी निशब्द झालो. माझ्या तोंडून सहजपणे शब्द निघाला, "बलात्कार"..! त्या शब्दाचा तिला अर्थही कळतं नव्हता. तिनं लागलीच विचारलं,"म्हणजे काय...?" या तिच्या निरागस प्रश्नाचं उत्तर मात्र मी देऊ शकलो नाही. बलात्कार ह्या शब्दांची दूरदूर पर्यंत ओळख नसण्याच्या याच निष्पाप वयात तिच्याच वयाची एक मुलगी देशाच्या एका कोपऱ्यात ओरबडली गेली. त्या मुलीच्या ओरबडण्याच्या वेदना आज मला माझ्या मुलींमध्ये दिसत होत्या. त्याच वेदनेतून मनात एक विजेसारखी शिसारी चमकून गेल्यासारखी झाली. संताप, वेदना आणि भीतीच्या एकत्रित भावना मनाला सुन्न करत होत्या. अशा कितीतरी निरागस मुलींचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते. त्या प्रत्येकांत मला असिफा दिसत होती. त्या प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर असिफाच्या वेदना जाणवत होत्या.. ती प्रत्येक मुलगी मला असुरक्षित असल्याचा भास होतं होता...! हा माझा भास मला तितकाच हतबल वाटतं होता; जितकी त्यावेळी असिफा हतबल होती..!
असिफा... तुला न्याय मिळेल की नाही मला माहित नाही. पण तुझ्यावर झालेल्या अन्यायान प्रत्येक मुलीचा बाप हेलावून गेला असेन हे नक्की. तुझ्या नंतर पुढची कोण असणार हाही इथल्या उघड्या डोळ्यांना सतावणारा प्रश्न आहे..! हे कृत्य करणारे माणसं तर नक्कीच नव्हते. ते जनावरं होते.. "पिसाळलेले जनावरं".आणी पिसाळलेल्या जनावरांना न्यायालयाच्या कठड्यात उभं केलं तर हेच पिसळलेल जनावरं न्यायव्यवस्थेचाही चावा घेतल्याशिवाय राहात नाही... सत्तेपुढे लाचार होणारी इथली व्यवस्था आणि राजकीय परिस्थिती तुला आणि तुझ्यासारख्या तमाम मुलींना न्याय देईल की नाही हे ही मी सांगू शकणार नाही. केवळ त्याचं शंकेमुळे ही पिसाळलेल्या जनावरांची संख्या प्रत्येक ठिकाणी वाढतं आहे आणि पिसाळलेल्या जनावरांना आटोक्यात आणण्यासाठी त्यांना दगडांनीच ठेचाव लागेलं ..!
हेच ठेचण्याचं काम करण्यात जर व्यवस्था कमी पडली तर ; कालांतराने आमच्यासारखे पालक लोकं शस्र हाती घेतील.. हे वेगळं सांगण्याची जरुरी नाही.!
लेखक
दादासाहेब श्रीकिसन थेटे
9764042323
Sweetdada11@gmail. Com

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें