एसबीआय बँकेत कर्मचारीच्या आपुर्या मनुष्यबळामुळे ग्राहकांची गैरसोय, - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 13 अप्रैल 2018

एसबीआय बँकेत कर्मचारीच्या आपुर्या मनुष्यबळामुळे ग्राहकांची गैरसोय,

एसबीआय बँकेत कर्मचारीच्या आपुर्या मनुष्यबळामुळे ग्राहकांची गैरसोय,


 शहरात तीन ग्राहक सेवा केंद्र व चार एटीएम असुनही सुविधेचा अभाव,


  बँक कर्मचारी संख्या वाढवण्याची ग्राहकातुन मागणी..


  प्रतिनिधी : भोकरदन (शेख सलीम)

  भोकरदन शहरातील स्टेड बँक आॅफ इंडिया व बॅंक आॅफ हैदराबाद या दोन्ही बँकेच्या विलनिकरणानंतर ग्राहकांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असली तरी कर्मचारी माञ तेवढेच असल्याने ग्राहकांना स्टेड बँक आॅफ इंडियाचे मनुष्य बळ कमी पडत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असल्याचे चिञ भोकरदन बॅंकेत पाहायाला मिळत आहे.

  भोकरदन शहरातील स्टेड बॅंक आॅफ इंडिया या शाखेत १ लाखाच्या असपास ग्राहक संख्या असुन,यामध्ये पेशंन व कर्मचारी वर्गाची सर्वाधिक खाते या बॅंकेंमध्ये आहेत,त्यामुळे नेहमीच या शाखेत गर्दी असते,रोज या सदरील बॅंकेत १ हजार ते १२ शे ग्राहक रोज दिड कोटीच्या असपास उलाढाल करतात.पण या बॅंकेत केवळ १३ कर्मचारी असुन,यामध्ये १ मॅनिजर,३ आॅफिसर,व ९ कर्मचारी आहेत.पण या शाखेचे ग्राहकांना सेवा देण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.

  मार्च ,एप्रिल,मे महिन्या मध्ये लग्न सराईचे दिवस असल्याने ग्राहकांना खरेदीसाठी पैसे लागत असल्याने व सदरील बॅंकेत ग्राहकांसाठी ३ एटीएम मशिन,१ पासबुक इंट्री मशिन,व ३ ग्राहक सेवा केंद्र चालु करण्यात आले आहे.

  शहरात ४ एटीएम मशिनमध्ये नेहमी खडखडाट असते
  भोकरदन शहरात  बॅंक आॅफ महाराष्ट्र,चिखली बॅंक,मलकापुर बॅंक,व तसेच एसबीआयचे एटीएमही सुट्टीच्या दिवसामध्ये पैशाअभावी बंद आवस्थेतच असते.

  प्रतिक्रिया : देवान घेवाण करून राजकारणी घेतात फायदा
  गरीबांना उद्दठ व खालच्या भाषेत बोलुन अरेरारी करणार्या मॅनीजरवर तात्काळ कारवाई करावी.तसेच सदरील शाखेचे मॅनिजर देवानघेवान करून राजकारणी लोकांना कर्ज वाटपाचे काम करतात व गरीबांना हकलुन लावतात.

   इसरार खान : मानव अधिकार जिल्हा अध्यक्ष भोकरदन  प्रतिक्रिया : कर्मचारी संख्या वाढवावी.  दोन बँकेच्या विलनिकरणाने ग्राहक संख्खेत वाढ झाली असुन बॅंकेमध्ये पेंशनचे ग्राहक सरकारी कर्मचारी,अशिक्षीत ग्राहक यांची संख्या जास्त आहे.वरिष्ठांना याविषयी कळवले आहे.तसेच  ग्राहकांनी आपले आधार कार्ड खात्याशी जोडावे.

  संजय पठाणीया : उप शाखा प्रबंधक भोकरदन,    एसबीआयच्या भोकरदन शाखेला ३६ गावे जोडली आहेत,एकुण ग्राहक संख्या १ लाखाच्या आसपास आहे,रोज एक हजार ते १२ शे ग्राहकांना मिळते सेवा,रोज दिड कोटीची होते उलाढाल..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें