सेलू नगरपालिकेचे मिशन स्वच्छता.
◆खबरदार शहर अस्वच्ध कराल तर..... दंड आकारला जाणार.
◾पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष बोराडे यांची माहिती◾
सेलू :- सेलू नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी प्रभावी मोहीम हाती घेतली असून या अभियानात सेलूकरांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी बुधवारी 27 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत केले.
बुधवारी नगराध्यक्षाच्या दालनात पत्रकार परिषदेत घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मुख्याधिकारी देविदास जाधव, उप नगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, मुख्य लेखापाल अशोक कासार, पाणीपुरवठा विभाग प्रमुख मनिषा कोंढेकर, स्वच्छता निरीक्षक राठोड, स्वच्छ अभियानाचे प्रमुख आयुबभाई अमिनोद्दीन आदींची उपस्थिती होती. सेलू शहर स्वच्छ करणे हे माझे टार्गेट आहे असे सांगून बोराडे पुढे म्हणाले की, शहरात ज्या ज्या भागात कचरा दिसेल त्या त्या भागाची थेट नगरपालिका प्रसासनाकडुन माहिती घेउन त्वरीत कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी नगरपालिकेची सर्व यंत्रणा पुढाकार घेउन या मोहिमेवर लक्ष ठेवुन आहेत. याबाबत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप सोबतच स्वच्छता अॅपच्या माध्यमातून 1398 नागरिक याचा वापर करीत आहेत. स्वच्छता अॅपवर शहरातील तक्रारी आल्यानंतर सर्वच्या सर्व तक्रारीचा विहित मुदतीत निपटारा करण्यात आला. सुचना आल्यानंतर काय कार्यवाही झाली याचीही माहिती तत्काळ दिली जाते.त्यामुळे सेलू शहरातील बहुतांश भाग अस्वच्छतेपासुन मुक्त होऊ लागला असुन शहरात स्वच्छतेबाबत आशादायक चिञ दिसुन येत आहे. सध्या 100 कर्मचारी, 7 घंटागाडी, 3 ट्रॅक्टर तर नाली व कचरा उचलून टाकणारी मशीन अशी यंत्रणा कार्यरत आहे. या स्वच्छता मोहिमांबाबत नागरिकांतूनही समाधानकारक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सेलूकरांनी नगरपालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेचे स्वागत केले.तर अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-यांवर कडक कारवाई करण्याच्या मागण्या केल्या.काही नागरिकांनी प्लॅस्टिक टाकणा-या व्यक्तींवर कारवाईची मागणी केली. सेलू नगरपालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेबाबत सर्वञ समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी हि मोहिम कायमस्वरुपी राबविणार कि तात्पुरती राबविली जाणार याबाबतही शंका उपस्थित केली आहे.
चौकट....
◆मुता-यांची कमतरता
शहरामध्ये मुता-यांची संख्या कमी असल्या कारणामुळे नागरीक लघुशंका मिळेल त्या जागी करत आहेत यामुळे स्वच्छ भारत अभियानामध्ये आडचणी येत आहेत म्हणुन सर्वाजनिक ठिकाणी शौचास बसणे, लघुशंका करणे तसेच कचरा करणा-या विरोधात दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. तर मुळात शहरात मुता-याच नसल्यामुळे मग नागरीकांनी कुठे जावे हा प्रश्न निर्माण होत आहे. तरी जागा उपलब्ध होतील अशा ठिकाणी मुता-या बांधल्या जातील असे ही नगराध्यक्षाच्या वतिने सांगण्यात आले आहे.
◾मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत स्वच्छता रॅली
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात स्वच्छता अभियान अधिक तीव्र करूण जागृती करण्याच्या हेतूने 4 जानेवारी रोजी मराठी सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत भव्य स्वच्छता रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी शहरातील सर्व शाळा, कॉलेज, शासकीय, निमशासकीय कार्यालये, पत्रकार संघ, सेवाभावी संस्था आदींचा सहभाग असणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी दिली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें