शिर्डी प्रतिनिधी :
कु.किरण जाधव
शिर्डी शहरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न सुरू असताना अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांना मिळालेल्या गुप्तखबरी कडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे अक्षय सुधाकर थोरात वय २२ राहणार वाघ वस्ती शिर्डी व त्याचा निमगाव कोर्हाळे गावातील सहकारी पवन सुभाष भोत वय २२ व आणखी एक अल्पवयीन सहकारी यांच्या हालचाली वर उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे स पो नि मिथुन घुगे दिपक गंधाले यांच्या पथकाने सापळा रचून एक हजार रुम शिर्डी या परिसरात सापळा लावून एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे अक्षय थोरात यांच्या कडून हस्तगत केली असल्याची माहिती शिर्डी पोलिसांनी दिली अक्षय थोरात व त्यांच्या सहकारी यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ९४७/२०१९भारतिय हत्यार कायदा कलम३/२५प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे थोरात याने हे हत्यार शिरपूर जिल्हा धुळे येथुन खरेदी केले होते थोरात यांच्यावर या अगोदर शिर्डी शहरात असलेल्या एका व्यापारी वर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे आरोपीने हत्यार गावठी कट्टा का खरेदी केला कधी केला तो मोबाईल वर कोणाच्या संपर्कात होता त्याला कोणी आर्थिक मदत केली या बरोबरच या तिघांच्या संपर्क मध्ये कोणकोण होते या बाबत अत्यंत बारकाईने जिल्हा पोलिस प्रमुख ईशु सिंधु यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी केली जाईल असे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे यांनी सांगितले शिर्डी सह श्रीरामपूर विभागाच्या कार्यक्षेत्रात गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहे शिर्डी शहरात चांगले परिणाम दिसून येत असुन पोलीस आणि जनता यांच्या मध्ये संवाद निर्माण व्हावा गुन्हेगारी बाबत पोलीसांना माहिती मिळावी यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत परीणाम दिसून येत आहे आणखी लगतच्या काळात चांगले परिणाम दिसून येतील असा विश्वास व्यक्त केला या कारवाईत प्रसाद साळवे बाबा सातपुते किरण कुर्हे अंजय अंधारे नितीन सानप यांनी भाग घेतला होता अधिक तपास सपो नि मिथुन घुगे करीत आहे
शिर्डी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गावठी कट्टा हस्तगत केला प्रसगी आरोपी समावेश अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे स पो नी मिथुन घुगे दिपक गंधाले व पोलीस पथक.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें